Click Here...👇👇👇

चंद्रपूर | कोरोनाने एकाचा मृत्यू, मृतदेह ताब्यात घेण्यासाठी कोविड सेंटर समोर नातेवाईकांचा राडा.

Bhairav Diwase
कोरोनाने एकाचा मृत्यू, मृतदेह ताब्यात घेण्यासाठी कोविड सेंटर समोर गोंधळ.
Bhairav Diwase. Sep 06, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- जिल्ह्यातील नागरिकांना कोरोनाच्या नावाची दहशत प्रशासनातर्फे केली जात आहे असता थेट आरोप आज कोरोनाने मृत पावलेल्या नागरिकाच्या नातेवाईकांनी केली.
केळझर येथील आनंद विद्यालयाचे अध्यक्ष शिवराम शेंडे यांना 3 दिवस आधी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, 3 दिवस ते कोरोना निगेटिव्ह होते परंतु चौथ्या दिवशी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला व त्यांचा मृत्यू झाला.
आधी डॉक्टरांनी न्यूमोनिया झाला असल्याचे सांगितले व नंतर अचानक त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला कसा, यावर त्यांचे नातलग प्रचंड संतापले असता त्यांनी कोविड सेंटर समोर गोंधळ सुरू केला.
मृतदेह आमच्या ताब्यात द्या अशी मागणी करू लागले सामान्य रुग्णालयात गोंधळ सुरू आल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता तात्काळ कोविड सेंटरची परिस्थिती पोलिसांनी हाताळली.
नातलगांचा आरोप आहे की प्रशासन हे कोरोनाच्या नावाने जनतेमध्ये भीती निर्माण करण्याच काम करीत आहे.