भा. ज. यु. मो. ने केला "गुरुजीं "चा सन्मान.

Bhairav Diwase
१५ प्राचार्यांचा मॅरॉथान सत्कार.

आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे तर्फे "वेपोरायझर" ची भेट.

भाजपा जिल्हाध्यक्ष (श)डॉ गुलवाडे यांची उपस्थिती.
Bhairav Diwase.    Sep 06, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- येथील भारतीय जनता युवा मोर्चा, महानगर तर्फे शिक्षकदिनाचे औचित्य साधून ऐका मॅरॉथान सत्कार कार्यक्रमाचे आयोजन शनिवार (५सप्टेंबर)ला करण्यात आले.यावेळी १५ प्रचार्यांचा सत्कार करण्यात येऊन माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांना अनोखी आदरांजली अर्पण करण्यात आली.विशेष म्हणजे यावेळी आ सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे पुढाकारातून सर्व प्राचार्यांना "वेपोरायझर" मशीन भेटस्वरूप देण्यात आल्याने, भाजयुमोंने केलेला  हा सन्मान चर्चेचा विषय ठरला.
              यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष(श)डॉ मंगेश गुलवाडे,उपमहापौर राहुल पावडे ,भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष(श) विशाल निंबाळकर,भाजपा नेते प्रकाश धारणे,नगरसेवक सुभाष कासंगोट्टूवार,जि प सदस्य ब्रिजभूषण पाझारे, प्रशांत विघ्नेश्वर,रामकुमार अकापेलिवार,भाजयुमो नेते सुरज पेदुलवार,प्रज्वलंत कडू , यांची उपस्थिती होती.
              
               शिक्षकदिन हा गुरू-शिष्य परंपरा जोपासणारा दिवस.बऱ्याच शाळा महाविद्यालयात या पावनदिनी विद्यार्थी शिक्षकांच्या परिवेशात असतात.या परंपरेला यावर्षी खंड पडू नये म्हणून प्रचार्यांचा मॅरॉथान सत्कार की कल्पना भाजयुमो युवानेते सूरज पेदुलवार  व प्रज्वलंत कडु यांनी आ मुनगंटीवार व जिल्हाध्यक्ष (श)डॉ गुलवाडे यांचे कडे मांडल्यावर लगेच दोघांनी सहमती दिली.त्याच वेळी सर्व प्रचार्यवृंदला कोविड१९ पासून सुरक्षित ठेण्यासाठी वेपोरायझर भेट स्वरूप देण्याच्या सूचना आ मुनगंटीवार यांनी केल्या.त्यानुसार भाजयुमोचे सुरज पेदुलवार ,प्रज्वलंत कडु, अभि वांढरे, रोशन गिरडकर, श्रीकांत येलपुलवार , विवेक शेंडे , यश बांगडे, मनोज पोतराजे, प्रविण उरकुडे,कुणाल गुंडावार , हिंमांशु गादेवार व सलमान पठाण हे कामाला लागले आणि,प्रा. अशोक जिवतोडे, प्रा. मोरे सर, प्रा. राजेश इंगोले, प्रा. अंजली हस्तक , प्रा. खान सर , प्रा. बेडेकर सर  , प्रा. दहेगावकर सर, प्रा. चव्हाण सर,  प्रा. हरीनखेडे सर, प्रा. ठाकरे सर , प्रा. साकोरे सर , प्रा. झंझाड माॅडम यांचा वेपोरायझर,सिंहावलोकन,सैनिकी शाळा पुस्तक,पंतप्रधानांचे-आ मुनगंटीवारांचे व डॉ गुलवाडे यांचे शुभेच्छा पत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी डॉ गुलवाडे म्हणाले,आई ही आपली प्रथम गुरू-शिक्षिका असते,तिचे ऋण आम्ही जन्मभर मानले पाहिजे.समाजातील प्रत्येक घटका  कडून शिकण्या सारखे आहे.फक्त आपली तयारी असावी.सर्व प्राचार्यांचे विशाल निंबाळकर यांनी आभार मानले.