कोकणला 400 कोटी तर, विदर्भाच्या 5 जिल्ह्यासाठी फक्त 16 कोटी
विदर्भाकडे संपूर्ण दुर्लक्ष करीत असून राज्य सरकार प्रादेशिक भेदभाव करीत आहे
Bhairav Diwase. Sep 09, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- महाराष्ट्राचे महाविकास आघाडी सरकार पुरग्रस्त विदर्भाकडे संपूर्ण दुर्लक्ष करीत असून प्रादेशिक भेदभाव करीत आहे. २५ वर्षात सर्वात मोठ्या पुरामुळे पूर्व विदर्भाचे भंडारा, गोंदिया, नागपुर, गडचिरोली, चंद्रपुर या पांच जिल्हयामध्ये प्रचंड नुकसान होऊनहीं फक्त १६ कोटी रु. मदत ची घोषणा करण्यात आली. परंतु आज पावेतो एक रुपया हि मदत मिळाली नाही. तर पश्चिम महाराष्ट्राच्या तीन जिल्ह्यासाठी ४०० कोटी रुपये मदत देण्यात आली होती. तसेच आज पर्यन्त पश्चिम महाराष्ट्राच्या एकही मंत्री विदर्भाकड़े फिरकले नाही सत्तेवर असणाऱ्या या सर्व मंत्र्याच्या उदासिनतेचा आम आदमी पार्टी आणि विदर्भाच्या जनतेच्या वतीने निषेध व्यक्त करते. चंद्रपुरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार हे महाराष्ट्राचे मदत व पुनर्वसन मंत्री असून आपत्ति निवारण्याचे सर्वच अधिकार त्यांच्याकडे आहे. असे असतांनासुद्धा विदर्भाला न्याय मिळऊन देण्यास अपयशी ठरत आहेत, जी गाव 100% पुरबाधित आहेत उदा किन्ही, लाड़ज ,दारडकिन्ही खरकळा, नेलगाव रणमोचन इ. या गावांमध्ये पंचनाम्याच्या नावाखाली विना कारण उशीर करीत आहे. या गावांमध्ये 100% लोकांच्या घरात पाणी शिरल्याने सर्वांचे नुकसान झालेले असून अजून रु. 10,000 का देण्यात आले नाही, हा मोठा गहन प्रश्न आहे. या शिवाय कुठेही सरकारमार्फत चारा छावणी, आरोग्य शिबीर लाविलेले नाही. काही गावांमध्ये तर अक्षरश: चुकीच्या पद्धतीने सर्वे होत आहे. “सडलेले धान्य दाखवा”, “भिजलेले कपडे दाखवा” असे विचारले जात आहे. “निसर्ग” चक्रीवादळा मध्ये दिलेली मदत विदर्भासाठी लागु झाली पाहिजे. तातडीची मदत म्हनुन ज्यांच्या घरी पाणी शिरले त्या प्रत्येक कुटुंबांना त्वरित दिले गेले पाहिजे. घरांसाठी रूपये रक्कम 1 लाख 50 हजार तसेच शेतीसाठी भरघोस नुकसान भरपाई दिली पाहिजे. याशिवाय ज्यांच्या शेतजमिनीचे नुकसान झाले त्यांच्या जमिनी शेतीयोग्य करून दिले गेले पाहिजे, अशी माहिती आम आदमी पार्टी चे अॅड पारोमिता गोस्वामी सदस्य, महाराष्ट्र राज्य समिती, जिल्हा संयोजक सुनील मुसळे, सहसंयोजक विजय सिद्धावार, सचिव संतोष दोरखंडे कोषाध्यक्ष भिवराज सोनी यांची यावेळी उपस्थिती होती.