गौरवास्पद चंद्रपूरातील युवक भारतीय वायू सेनेच्या फायटर प्लेन पदी नियुक्त.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Sep 20, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- बालपणाचं स्वप्न जेव्हा मोठे झाल्यावर तेच स्वप्न पूर्ण होते त्यावेळी त्याचा आनंद द्विगुणित असतो. असंच एक बालपणातील स्वप्न चंद्रपूर शहरातील एका युवकाने अवघ्या 19 व्या वर्षी पूर्ण केले. 

     त्या युवकाचे नाव अर्जुन वीरेंद्र जायस्वाल । 0 वी पर्यन्त शिक्षण चंद्रपूर शहरात केले । 2 वि नंतर अर्जुनने नॅशनल डिफेन्स अकॅडमी येथे प्रवेश घेत भारतीय वायू सेनेच्या फायटर प्लेन पायलटची परीक्षा देत रँक मिळवली. सर्व परीक्षेत यश वून अर्जुन ची मेडिकल झाल्यावर तो आपल्या स्वगावी पोहचला असता आई वडिलांनी अर्जुनचे उत्साहात स्वागत केले . बालपणापासून अर्जुनला आई वडिलांनी दुसऱ्या क्षेत्रात करियर करावं करण्यासाठी समजूत काढली परंतु अर्जुनच्या मनात आधीच देशाची सेवा करून मोठं व्हायचं ठरलं असल्याने अर्जुनने आपलं क्षेत्र निवडलं व त्या क्षेत्रांतच यशस्वी होऊन तो परत आला अशी माहिती अर्जुनच्या आईने दिली.
     
      लवकरच अर्जुन फायटर प्लेन चे प्रशिक्षण पूर्ण करून भारतीय वायू सेनेत दाखल होणार आहे , अर्जुनचं यश हे चंद्रपूर जिल्ह्यासाठी गौरवाची बाब आहे .