मागील सरपंचाला निरोप देत स्वीकारला प्राशसक पदाचा पदभार.
(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- चिमूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या चिचाळा(शास्त्री) गट ग्राम पंचायत चे प्रशासक म्हणून चिमूर पंचायत समितीचे कृषी अधिकारी घनश्याम पसारे यांनी सोमवार ला आपल्या पदाचा पदभार स्विकारला.
राज्यातील अनेक ग्रामपंचायतची मुदत संपली आहे कोरोनामुळे सध्या ग्राम पंचायत निवडणूका होणे शक्य नसल्याने राज्य सरकारने निवडणुका सहा महिने पुढे धकळल्या आहेत.गावातील कारभार सुरळीत चालावा यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती प्रशासक म्हणून मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर केली आहे.
माजी सरपंच सौ.जोत्सना विनायक वासनीक यांनी मागील पाच वर्षे चिचाळा(शा.) गट ग्राम पंचायत पदाचा प्रभार संभाळला असून त्यांच्या काळात अनेक विकास कामे पूर्ण झाली संत गाडगे बाबा स्वछता पुरस्कार मिळण्यासाठी त्यांचे मोलाचे योगदान आहे.त्यांनी अत्यंत कर्तव्यदक्षतेनी आपला प्रभार सांभाळला त्यामुळे ग्राम पंचायत पदाधिकारी यांनी त्यांचे स्वागत करत त्यांना निरोप दिला.
कृषी अधिकारी पसारे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मा.सरपंच सौ वासनीक, सचिव पी.डी.राऊत, विनायक वासनीक, पत्रकार अरविंद राऊत, प्रश्नांत सुखदेवे, दिपराज रामटेके, परिचर संजय सुखदेवे, संगणक परिचालक नवींद्र वासनीक उपस्थित होते.