(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यात जनता कर्फ्यु लावण्यासंदर्भात चर्चा करण्याकरिता पालकमंत्री चंद्रपूर यांच्या अध्यक्षतेखाली उद्या नियोजन भवन येथे बैठक होणार असून या बैठकी मध्ये सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून जनता कर्फ्यू संदर्भात निर्णय होणार आहे. परंतु या जनता कर्फ्यू ला लोकांचा व काही राजकीय नेत्यांच्या विरोध आहे काही राजकीय नेत्यांनी समाज माध्यमांवर आपले मत व्यक्त केले आहे.