नवनिर्मित अभ्यासिकेत परीक्षेद्वारे पदभरती घेण्याची स्टुडंट फोरम ग्रुपची मागणी.

Bhairav Diwase

Bhairav Diwase.    Sep 03, 2020

(आधार न्यूज नेटवर्क शहर प्रतिनिधी) सैय्यद नदीम अली, कोरपना

कोरपना:- कोरपना येथे मिशन सेवा अंतर्गत भव्य अशी अभ्यासिका तयार करण्यात आली असून तिचा नुकताच लोकार्पण सोहळा पार पडला. सदर अभ्यासिकेची मागणी स्टुडंट फोरम ग्रुपने सन 2018-19 यावर्षी विद्यार्थी हिताच्या दृष्टिकोनातून करण्यात आली होती.
          त्याच अनुषंगाने स्टुडंट फोरम ग्रुप कोरपना तर्फे अभ्यासिकेत होणाऱ्या पद भरतीची प्रक्रिया तत्काळ राबवून. नगर पंचायत परिक्षेत्रातील होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थिती कमजोर असल्यामुळे शिक्षणापासून वंचित राहण्याची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून परीक्षा पद्धतीने पद भरती घेऊन अशा होतकरू विद्यार्थ्यां पैकी  प्रावीण्य प्राप्त करणाऱ्या उमेदवारांना अभ्यासिकेतील पद भरती प्रक्रियेत सामील करून घ्यावे. या बाबत मा. तहसीलदार साहेब कोरपना, मा. मुख्याधिकारी मॅडम नगर पंचायत कोरपना, नगराध्यक्षा मॅडम नगर पंचायत कोरपना, तथा नगर सेवक नगर पंचायत कोरपना यांना मागणीचे निवेदने देण्यात आले.