ब्रम्हपुरी तालुक्यातील पिंपळगाव (भोसले)व इतर गावातील पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी दौरा.
चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडीया यांनी दिला पूरपरिस्थिचा आढावा.
Bhairav Diwase. Sep 03, 2020
(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
ब्रम्हपुरी:- चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील गावात जे महापूराचे संकट आले ते आसमानी संकट नसून हे चुकीच्या नियोजनाने आले सुलतानी संकट असून चुकीच्या नियोजनामुळे आलेले आहे गोसीखुर्द प्रकल्पाची दरवाजे उघडण्याआधी प्रशासनाने पूर्वसूचना न देता दरवाजे उघडले त्यामुळे नागरिकांचे अतोनात नुकसान झाले लोकांची घरे,गुरांचा चारा ,जीवनावश्यक वस्तू पुरात वाहून गेल्या आहेत,परंत खेदाची गोस्ट ही आहे की अजून पर्यंत प्रशासनाने कुठलीच मदत केली नाही सरकारची मदत ह्या नागरिकांना मिळाली नाही हे निष्क्रिय सरकार महाराष्ट्र राज्यात असल्याची टीका महाराष्ट्र राज्याचे विरोधीपक्ष गटनेते माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी केली.
मागील काळात महाराष्ट्र राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार होते व तेव्हा पश्चिम महाराष्ट्र मध्ये अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते तेव्हा तात्कालीन मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे हे तेथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सरकारनी भरीव मदत करावी अशी मागणी करत होते तेव्हा सरकारनी तेथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत उपलब्ध करून दिली व मदतीच्या नियोजनासाठी नवनवीन शासन निर्णय तयार केले व शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारी तिजोऱ्या खुल्या केल्या तेवढीच मदत आता देखील या महाविकास आघाडी सरकाने पूर्व विदर्भातील पूरग्रस्तांना द्यावी अशी मागणी श्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.व सरकारकडून भरीव मदत मिडवून देण्याचा विश्वास ब्रम्हपुरी तालुक्यातील पूरग्रस्त नागरिकांना दिला.
राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधतांना बोलले की आसमानी संकट आले असते तर नुकसान झाले असते परंतु अनियोजीत दरवाजे उघडल्यावर जे नुकसान झाले ते खूप मोठे आहे लोकांची घरे, घरातील मौल्यवान वस्तू शासकीय,कागदपत्रे, शैक्षणिक कागदपत्रे या महापुरात वाहून गेली संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले परंत अजूनपर्यंत शासनाची मदत झाली नाही ही मोठ्या खेदाची गोस्ट आहे भारतीय जनता पार्टीने पूरग्रस्त भागात संपूर्ण सहकार्य करून भरीव मदत केली सर्व जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा केला लोकांना सुरक्षित स्थळी पोहचविले परंतु या निर्दयी महाराष्ट्र सरकार ला या जनतेची कीव आली नाही येत्या अधिवेशनाच्या काळात मदतीचा मुद्दा गाजवून भरीव मदत मिळवून देण्याचा विश्वास नागरीकांना दिला.
चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांनी महाराष्ट्र राज्याचे विरोधीपक्ष गटनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ब्रम्हपुरी तालुक्यातील पूरग्रस्त परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या समस्याची माहिती देत पुरामुळे झालेल्या घराची गुरांची गोठ्याची,शेतीच्या झालेल्या नुकसानाची भरीव मदत पूरग्रस्त नागरीकांना मिडवून देण्याची मागणी केली.व महाराष्ट्र सरकारच्या विरोधात तीव्र नाराजी देर्शविली येत्या अधिवेशनात ब्रम्हपुरी तालुक्यातील पूरग्रस्त गावांत जे नुकसान झाले त्या नुकसानभरपाई च्या भरीव मदतीचा मुद्दा अधिवेश काळात उठविण्याचा विश्वास उपस्थित पूरग्रस्त नागरिकांना दिला.ब्रम्हपुरी तालुक्यातील पूरग्रस्त गावातील नागरिकांना संपूर्ण सहकार्य करण्याचा विश्वास उपस्थित नागरिकांना दिला.
महाराष्ट्र राज्याचे विरोधीपक्ष गटनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमदार बंटी भांगडीया यांनी ब्रम्हपुरी तालुक्यातील पिंपळगाव, कीन्ही या गावांतील घरांची प्रत्यक्ष पाहणी करून दिली यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी ऊर्जा मंत्री तथा सरचिटणीस महाराष्ट्र राज्य चंद्रशेखर बावनकुळे, माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार,खासदार अशोक नेते आमदार बंटी भांगडीया,माजी आमदार अतुल देशकर,आ.परिणय फुके,जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.संध्याताई गुरनुले,माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवरावजी भोंगळे, माजी जी.प.,उपाध्यक्ष कृष्णा सहारे, भाजपा जेष्ठ नेते वसंत वारजूकर,भाजपा जेष्ठ नेते राजू देवतळे,गणेश तर्वेकर,आवेश पठाण,सचिन आकुलवार, शिरीष वानखेडे व समस्त भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.संपूर्ण आढावा कार्यक्रमाचे संचालन भाजपा जेष्ठ नेते राजू देवतळे यांनी केले..