एक ठार, चार गंभीर रित्या जखमी.
आदिलाबाद महामार्ग वरील घटना.
(आधार न्यूज नेटवर्क शहर प्रतिनिधी) सैय्यद नदीम अली, कोरपना
कोरपना:- कोरपना कडून आदिलाबाद कडे जाणाऱ्या ट्रक व विरुद्ध दिशेने येणाऱ्या मॅक्स या दोन्ही वाहनाचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात घडला. यामध्ये एकाचा मृत्यू तर चार जण गंभीर रित्या जखमी झाले. ही घटना सोमवारी दुपारी तीन वाजता च्या दरम्यान कोरपना – आदिलाबाद महामार्ग वरील परसोडा फाट्यावर घडली.
प्राप्त माहितीनुसार, कोरपना कडून आदिलाबाद कडे जाणाऱ्या ट्रक क्र एपी १ एक्स ७२७२ चा टायर फुटल्याने त्याचे वाहन वरचे नियंत्रण सुटले. तसेच समोरून येणाऱ्या मॅक्स क्र एम एच ३४ के १५०३ चेही नियंत्रण सुटले गेले.यात मॅक्स वाहनातील चालक शफी शेख, शेख कालू ( ३२ ) रा.कोरपना हा जागीच मृत पावला.तर, जोशना नागेश सहारे ( ४०), नरेश साहारे ( ३०), नयन नागेश सहारे (९) सर्व राहणार रामनगर आदीलाबाद, विशाल नागोराव गावंडे (३२) रा.पारडी हे चौघे गंभीररीत्या जखमी झाले. त्यांना उपचारासाठी कोरपना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र जखमींची स्थिती गंभीर असल्याने चंद्रपूरला रेफर करण्यात आले. घटनेचा पुढील तपास ठाणेदार अरुण गुरनुले यांचे मार्गदर्शनाखाली कोरपना पोलिस करीत आहे.