चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स पोंभूर्णा येथे शिक्षक दिन मोठ्या आनंदाने वर्च्युअल पद्धतीने साजरा.

Bhairav Diwase
Bhairav Diwase.    Sep 05, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स पोंभूर्णा येथे आज दिनांक 5 सप्टेंबर 2020 ला शिक्षक दिन मोठ्या आनंदाने वर्च्युअल पद्धतीने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष चिंतामणी विज्ञान महाविद्यालय पोंभूर्णा येथील प्राचार्य डॉक्टर सुधीर हुंगे सर होते. प्रमुख पाहुण्या म्हणून चिंतामणी कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स गोंडपिपरी येथील ग्रंथपाल प्राध्यापिका नलिनी जोशी ह्या ऑनलाइन रित्या उपस्थित होत्या. जोशी मॅडम यांनी करोना काळातील ऑनलाइन शिक्षण यावर आपले मत मांडले तसेच ओपन एज्युकेशन रिसोर्सेस यावर माहिती दिली.  डॉक्टर मेघा कुलकर्णी यांनी प्रास्ताविक सादर केले तर डॉक्टर सुप्रिया वाघमारे यांनी करोना काळात प्राध्यापक कशाप्रकारे ऑनलाइन एज्युकेशन द्वारे विद्यार्थ्यांच्या संपर्कात आहेत आणि विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत याचे सादरीकरण केले. शिक्षक उत्तम पिढी घडवण्यास कसा जबाबदार असतो असे मत विद्यार्थी प्रतिनिधी मधून कुमारी अंकिता गद्देकार बीएससी फायनल ईयर व कुमारी इशा रामटेके बीएससी सेकंड ईयर या दोन्ही विद्यार्थिनीने मांडले. सोबतच सायन्स एज्युकेशन सोसायटी च्या समितीची स्थापना नव्याने करण्यात आली. याचे सादरीकरण प्राध्यापिका वर्षा शेवते यांनी केले. समाजात वावरणारा प्रत्येक व्यक्ती आपल्याला काही ना काही शिकवून जातो व तो सुद्धा आपला गुरु असू शकतो असे मत डॉक्टर सुधीर हुंगे यांनी आपल्या भाषणात मांडले. कार्यक्रमाचे संचालन डॉक्टर वैशाली मुरकुटे यांनी केले असून आभार प्राध्यापिका सरोज यादव यांनी मानले. वर्च्युअल शिक्षक दिन असूनही विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद कार्यक्रमाला लाभला. कार्यक्रम योग्यरीत्या पार पाडण्याकरिता प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सर्व शिक्षक सहकाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली.