भाजपाला मोठे खिंडार.
Bhairav Diwase. Sep 05, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- कोरपना तालुक्यांतीलच नव्हे तर चंद्रपूर जिल्ह्यातील एक अभ्यासू नेता जनतेच्या समस्यांची जान असणारा मुस्लिम समाजातील झुंजार असा एकमेव राष्ट्रवादीला मिळाला असून यामुळे पक्ष बळकटीला चालना मिळेल आज कुसुंबी गावातील आदिवासी ची जमीन माणिकगड सिमेंट कंपनी ने बे-कायदेशीर हस्तगत केल्याने सय्यद आबिद अली जन सत्याग्रह संघटन चे माध्यमातून आदिवासीना न्याय मिळून देण्यासाठी मागील कित्ये क वर्षापासून लढा देत आहे. असा कर्मठ नेता राष्ट्रवादीला मिळाल्याने पक्ष वाढण्यास मदत होईल असे मत गडचांदूर नगर परिषद चे उपाध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस कोरपना तालुका अध्यक्ष शरद जोगी यांनी प्रसार माध्यमाला सागितले.