Top News

उद्यापासून संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात जनता कर्फ्यु ला सुरूवात.

"जनता कर्फ्यु" पाळून नागरीकांच्या सुरक्षतेसाठी सहकार्य करावे:- अजय गुल्हाने जिल्हाधिकारी चंद्रपूर

Bhairav Diwase.    Sep 24, 2020

(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्हयातील सर्व नागरीकांना जाहीर आवाहन चंद्रपूर जिल्हयांतर्गत सर्व व्यापारी संघ, स्थानिक नागरीक व लोकप्रतिनिधी यांच्या सुचना व सहमतीने चंद्रपूर जिल्हयांतर्गत दैनंदिन वाढत असलेले कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता त्यावर प्रतिबंध करणे व कोरोना रोगाची साखळी खंडीत करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी लोकांची गर्दी कमी करणे, याकरीता दिनांक 25 सप्टेंबर 2020 पासुन ते दिनांक 01 ऑक्टॉबर 2020 पर्यंत स्वयंस्फुर्तीने “जनता कर्फ्यु" पाळण्याचे दिनांक 21 सप्टेंबर 2020 ला झालेल्या सभेत ठरविण्यात आलेले आहे.


1) दिनांक 25/09/2020 ते दिनांक 01/10/2020 पर्यंत खालील सेवा नियमितपणे सुरु राहतील:- अ ) सर्व दवाखाने व औषधी दुकाने, कृषी केंन्द्र व पशु खाद्य दुकाने, सर्व शासकीय कार्यालय, बैंक, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळांतर्गत औद्योगिक आस्थापना (कार्यालयीन दिवशी), घरपोच सेवासह दुध वितरण, वर्तमान पत्र, एल.पी.जी. गॅस वितरण, पेट्रोल पंप व हॉटेल मधुन Delivery Boy व्दारे घरपोच सेवा सुरु राहील‌. परीक्षेसाठी येणारे विद्यार्थी व त्यांचेसोबत त्यांचे पालक यांना परवानगी राहील. सोबत प्रवेशपत्र बाळगावे.

2) दिनांक 25/09/2020 ते दिनांक 01/10/2020 पर्यंत  खालीलप्रमाणे बंद राहतील:- सर्व किराना दुकान,  भाजीपाला व फळे, सर्व प्रकारच्या व्यापारी आस्थापना / दुकाने उपरोक्त कालावधीत बंद राहतील.

3) उपरोक्त कालावधीत वरील क्रमांक 1 मधील सुविधा सोडून चंद्रपूर जिल्हयातील सर्व पानठेला / चहा टपरी व  हातगाडी, फुटपाथ वरील चायनीजसह इतर सर्व प्रकारची दुकाने / आस्थापना बंद राहतील.

      वरील प्रमाणे कोरोना रुग्णांची साखळी तोडण्यासाठी सर्व नागरीक/ लोकप्रतिनिधी व इतर सर्व दुकानदार यांनी स्वयंघोषीत "जनता कर्फू" पाळून नागरीकांच्या सुरक्षतेसाठी सहकार्य करावे.


       25 सप्टेंबर ते 01 ऑक्टोंबर पर्यंत जनता कर्फ्यू असणार आहे. विनाकारण घराबाहेर पडू नये. या जनता कर्फ्यू ला सर्वांनी सहकार्य करावे. सर्वांनी मास्क चा वापर करावा, वेळोवेळी आपले हात स्वच्छ धुवावे, सोशल डिस्टंसिंग चे पालन करावे. असे आव्हान जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने