(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- नुकतेच सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली असुन अनेक नेते व अनेक संघटना मराठा समाजाचा समावेश ओबीसी संवर्गात करुन मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे.असे म्हणत आहे.मात्र हे चुकीचे आहे.अजुनपर्यत ओबीसीचे १९% आरक्षण महाराष्ट्रातील अनेक जिल्हात मिळालेले नाहीत.त्यात चंद्रपुर ११% यवतमाळ १४%,धुळे, नंदुरबार, नाशिक, रायगड, पालघर ९%आणि गडचिरोली ६%अशा प्रकारे ओबीसीच्या आरक्षणात विसंगती दिसुन येते. ही विसंगती त्वरित दुर करण्यात यावी तसेच मराठा आरक्षणाला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा विरोध नाही मात्र मराठा समाजाचा ओबीसी संवर्गात समावेश करु नये.
तसेच केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारने जातनिहाय जनगणना करावी.असे निवेदन आज दि 24/9/2020 ला पोंभुर्णा तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री व इतर मंत्रांना देण्यात आले.यावेळेस ओबीसी प्रवर्गात येणाऱ्या समाजाचे पदाधिकारी श्री सुधाकरभाऊ ठाकरे, श्री बाळूभाऊ दिवसे , श्री .मोहन चलाख नगरसेवक पोंभुर्णा, आणि अन्य ओबीसी बाधव उपस्थित होते.