आज पासुन गडचिरोली- हराबा- उपरी- चंद्रपुर बस सुरु; प्रवाशात आनंद.
Bhairav Diwase. Sep 15, 2020
सावली:- केंद्र शासनाने तसेच राज्यशासनाने राज्यातील लालपरीला हिरवा कंदील दिला आहे. परंतु सदर लालपरी ही केवळ मुख्य मार्गावरच धावत असल्यामुळे खेड्यापाड्यातील नागरिकांना शासकीय कामे, खाजगी कामे, दवाखाना अशा विविध कामानिमित्त तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. परंतु लालपरी तसेच खाजगी गाड्यासुध्या बंद असल्यामुळे नागरिकांना ये-जा करण्यासाठी खूप मोठं त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी प्रहार सेवक राकेश गोलेपल्लीवार यांनी ST महामंडळ तसेच चंद्रपुर जिल्हाचे पालकमंत्री साहेब यांना निवेदन देण्याचे ठरविले आहे. निवेदनाद्वारे शासनाला होणाऱ्या त्रासाची माहिती करून देऊन होणाऱ्या हालअपेष्टा बंद कराव्यात व ग्रामीण भागात एस टी सेवा सुरू करण्यात यावी. अशी मागणी प्रहार सेवक राकेश एम गोलेपल्लीवार यांनी केली होती.
(वाहतुकीच्या साधनाअभावी नागरिकांची गैरसोय.)
आधार न्यूज नेटवर्क ला प्रकाशित केलेली न्युज:-
आधार न्यूज नेटवर्क'ला प्रकाशित केलेल्या बातमीची व सावली तालुक्यातील प्रहार सेवक राकेश गोलेपल्लीवार, प्रहार सेवक प्रफुल तुम्मे यांच्या निवेदनाची प्रशासनाकडून दखल घेत, आज पासुन गडचिरोली- हराबा- उपरी- चंद्रपुर बस सेवा सुरु करण्यात आली आहे. प्रवाशांमध्ये आनंदाच वातावरण निर्माण झाल आहे.