वेबिनार माध्यमातून एकलव्य शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्याशी साधले संवाद.

Bhairav Diwase
सुनील भाकरे सर  यांचे मार्गदर्शन.
Bhairav Diwase.    Sep 07, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- कोरोना संकट काळात शाळेतील  विद्यार्थी ,शिक्षक आणि पालक यांच्याशी दुरावा निर्माण झालेला आहे .हा दुरावा कमी करण्यासाठी सुनील भाकरे सर  यांनी एकलव्य निवासी शाळा देवाडा येथील  विद्यार्थी ,शिक्षक आणि पालक यांच्याशी वेबिनार माध्यमातून संवाद साधले.
      संपूर्ण जगात कोरोना प्रदुभावानी  थैमान घातले आहे. लॉक डाऊन काळात एकमेकाशी संवाद साधले कठीण झाले आहे. शाळाचे सत्र जून महिन्यात सुरू झाले तरी शाळा बंद असल्याने  शाळा ओसाड झाले आहे.विद्यार्थी ,शिक्षक व पालक यांच्याशी दुरावा निर्माण झाले आहे.
      हा दुरावा कमी करण्यासाठी सुनील भाकरे  सर ईएमआरएसच्या राज्य सिबीएसई तथा शैक्षिक  प्रभारी महाराष्ट्र यांनी एकलव्य मॉडेल निवासी शाळा देवाडा येथील , प्राचार्या शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्याशी वेबिनारच्या माध्यमातून संवाद साधले. या प्रसंगी सुनील भाकरे  सर यांनी कोरोना या संकट काळात  आपली काळजी घेणे गरजेचे आहे .तसेच इतरांना कसे सावध राहावे या संदर्भात मार्गदर्शन केले. तसेच या कठीण काळात शिक्षकानी पालक व विद्यार्थी यांच्याशी ऑनलाईन किव्हा  प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांच्या समस्या सोडवण्याचे प्रयत्न करावे. विद्यार्थना अभ्यासाचे महत्त्व विशद करून त्यांना अभ्यासा प्रती गोडी निर्माण करावे  . आज सोशल मीडियाचे प्रभाव वाढत असल्याने विद्यार्थनी सोशल मीडियाचा वापर आपल्या चांगल्या कामा साठी करावे.असे आवाहन त्यांनी केले 
    आधुनिक युगात समाजात अमुलाग्र बदल होत आहेत. त्यामुळे समाजातील सर्वच घटकावर अनुकूल आणि प्रतिकूल परिणाम होत असल्याचे चित्र दिसत आहे विशेष करून लहान मुले व मुली यांच्यावर झपाट्याने अमुलाग्र बदल होत आहेत .त्यामुळे पालकांनी मुलांच्या पालनपोषण करताना विशेष लक्ष देण्याची गरज आहे. पालकांनी आपल्या पाल्या सोबत मित्रताचे संबंध प्रस्थापित करून त्यांचा सोबत व्यवहार करावे. असे आवाहन श्री. सुनील भाकरे सर यांनी वेबिनार ऑनलाईन चर्चा सत्र माध्यमातून पालकांना मार्गदर्शन केले.
या वेबिनार ऑनलाईन चर्चा सत्र मध्ये एकलव्य मॉडेल निवासी शाळा देवाडा येथील  प्राचार्या,  शिक्षक ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तथा सदस्य ,  विद्यार्थी व पालक यांनी सहभाग घेतले. या वेबिनार ऑनलाईन चर्चा सत्राचे आभार प्रदर्शन शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष गोपाल गायकवाड यांनी केले.