या आठवड्यात होणार चंद्रपुर व गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदीचा निर्णय:- पालकमंत्री आ. वडेट्टीवार

Bhairav Diwase

चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याची दारु हटवण्यासाठी अनेक मंत्री अनुकूल.

Bhairav Diwase.    Sep 07, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- विदर्भातील काही भागात पूर परिस्थिती बघता आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार हे पूरग्रस्त भागात जाऊन पाहणी करीत आहे, त्यामुळे 2 सप्टेंबरला मुंबई मध्ये उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणारी बैठक रद्द करण्यात आली होती,

परंतु चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी हटावी यासाठी पालकमंत्री वडेट्टीवार यांनी उत्पादन शुल्कमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह याबाबत चर्चा झाली आहे. 

आजपासून राज्याचं 2 दिवसीय पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे , या अधिवेशनानंतर कॅबिनेट समोर दारूबंदी हटविण्याबाबत प्रस्ताव ठेवल्या जाणार आहे , चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याची दारूबंदी हटावी याबाबत अनेक मंत्र्यांनी अनुकूलता दाखविली आहे अशी माहिती पालकमंत्री वडेट्टीवार यांनी दिली आहे .