कोरोना काळात गावातील तरुण देत आहेत स्वच्छतेचे धडे.

Bhairav Diwase
चिचाळा(शास्त्री) येथील युवा तरुणांचा आगडावेगडा उपक्रम, गावात स्थापन केली स्वच्छता दल समिती.
Bhairav Diwase.    Sep 05, 2020
(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- संपूर्ण जगात कोरोनाच्या महामारीचे संकट सुरू असतांना प्रत्येकांनी स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे.गावांतील आरोग्य सुरळीत राहावे यासाठी गावात स्वच्छता राहणे महत्त्वाचे असल्याने चिचाळा(शास्त्री) येथील युवा तरुणांनी गावात स्वच्छता करण्याच्या उद्देशाने गावात स्वच्छता दल समितीची स्थापना केली.

   दलाच्या निमित्ताने गावांतील सार्वजनिक ठिकाणी असलेला काडी कचरा साफ करणे, गाव पूर्णपणे हागणदारीमुक्त करण्यासाठी कार्य करणे लोकांना स्वच्छतेचे महत्व समजावून सांगणे रस्त्यावर अवैध बांधलेली जनावरे हटविणे सार्वजनिक ठिकाणी केलेली अतिक्रमण हटविणे अशाप्रकारची सामाजिक कार्य ही समिती करत आहे.गावातील सर्व कचरा सफाई करून गावतील मुख्य रस्ते व गल्ल्या या समितीने झाळून काढल्या आहेत त्याचप्रमाणे रस्त्याच्या कळेला असणारा कचरा साफ केल्याने गावाला एक नवीन रूप आले आहे.समितीचे कार्य लोकपयोगी असल्याने गावातील गट ग्रामपंचायत येथील सचिव सरपंच, पोलिस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष व सामाजीक कार्यकर्ते या समितीला सहकार्य करत आहेत.गावांमध्ये समितीने सुचविलेल्या विविध अडचणीच्या संदर्भात ग्राम पंचायत दवंडी द्वारे लोकांना सूचित करत आहे.गावात स्वच्छता कायम ठेवणे हे या समितीचे मुख्य उद्दिष्ट आहे.
 
  समितीचे नेतृत्व चिचाळा(शा.) गावातील युवक करत असून समितीत बबलू रामटेके, मंगेश सुखदेवे, सुमेद सुखदेवे, हर्षल राऊत, अतुल राऊत, प्रणय शंभरकर, विशाल रामटेके, महेश रामटेके, स्वप्नील सुखदेवे, संकेत सुखदेवे, रोशन सुखदेवे, हे सक्रिय कार्य करत आहेत.