सुदर्शन निमकर यांच्या जन्मदिनानिमित्त 30 रक्तदात्यांनी केले रक्तदान.

Bhairav Diwase
Bhairav Diwase.    Sep 05, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- राजुरा चे माजी आमदार  सुदर्शन निमकर यांच्या जन्मदिनानिमित्त श्रीराम मंदिर राजुरा येथे सुदर्शन निमकर मित्र परिवार यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ३० कार्यकर्त्यांनी रक्तदान करून राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदवित वाढदिवस साजरा केला. रक्तदान शिबिराचे उद्घाटन अरुण मस्की यांच्या हस्ते करण्यात आले.
        कार्यक्रमाचे अध्यक्ष सतीश धोटे, प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार सुदर्शन निमकर, जिल्हा परिषद कृषी सभापती सुनील उरकुडे, नगरसेवक राधेश्याम अडनिया, अविनाश जाधव, साजिद बियाबानी, वाघुजी गेडाम, प्रशांत घरोटे, विठ्ठल येवले, महेश रेगुंडावर, चुनाळा सरपंच दिनकर कोडापे उपसरपंच बाळनाथ वडस्कर,  हरिभाऊ झाडे, नितीन बांब्रटकर, रामभाऊ देवईकर चूनाळा सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष संजय पावडे, दिलीप मैसने, मंगेश श्रीराम, सचिन डोहे, दिलीप वांढरे, सचिन शेंडे, दिलीप गिरसावळे, किसनराव मुसळे, संगेश पावडे, अनुराधा मुर्लीधर निमकर, संदीप गायकवाड, राहुल थोरात, मोहन कलेगुरवार, छबिलाल नाईक, सुधिर अरकिलवार,  रवी बुरडकर
उपस्थित होते. 
     सुदर्शन निमकर यांच्या वाढदिवसानिमित्त मास्क वाटप करण्यात आले. दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात असून रक्तदानाचे महत्त्व जाणून आजपर्यंत शेकडो रक्तदात्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान करून राष्ट्रीय कार्यात आपला सहभाग नोंदविला.
      रक्तदान शिबिरात चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालय रक्तपेढीच्या वतीने समाजसेवक अधीक्षक संजय गवित, रक्तपेढी तज्ञ वर्षा सोनटक्के, सहाय्यक तज्ञ लक्ष्मण नगराळे, रुपेश घुमे यांची उपस्थिती होती.