पब्जीसह 118 अॅपवर बंदी.
भारत आणि चीनमध्ये सुरु असलेला तणाव पुन्हा वाढताना दिसून आला. त्यामुळे पुन्हा भारताने चीनविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. तरूणांना वेड लावणाऱ्या पबजी गेमवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे.
पबजी या गेमसह केंद्र सरकारने 118 अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. यापूर्वीही केंद्र सरकारने चीनच्या 59 अॅप्सवर बंदी घातली होती. यामध्ये टिकटॉक, युसी ब्राऊसर या अॅप्सचा समावेश होता.
केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम 69 अ अंतर्गत पबजी गेमवर बंदी घालण्यात आली आहे. भारताच्या सुरक्षेशी संबंधीत गोष्टीमध्ये सहभागी असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.