ग्रामपंचायत च्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र सिल.
Bhairav Diwase. Sep 12, 2020
(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- पाच महिन्यांचा कालावधी नंतर शंकरपूर येथे कोरोनाने शिरकाव केला असून येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी व त्यांचे पती कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहे. शंकरपूर ही मोठी बाजारपेठ असून आजवर हे गाव कोरोणा मुक्त परंतु आज पती-पत्नी यांच्या अहवाल पॉझिटिव आल्याने सतर्कता बाळगावी तसेच ग्रामपंचायत च्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र सिल करण्यात आले आहे. याशिवाय मंगळवार पर्यंत उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात कुणीही जाऊ नये. असे आव्हान ग्रामपंचायत तर्फे करण्यात आले आहे.