चिमूर तालुक्यातील कृषी अधिकारी यांचा कृषिकेंद्राना आशिर्वाद.
Bhairav Diwase. Sep 11, 2020
चिमूर:- सध्या जगात कोरोच्या महामारीचे संकट सुरू आहे मात्र जगाचा पोशिंदा समजला जाणारा शेतकरी याही परिस्थितीत शेतीमधील पीक पिकवत आहे अनेक रोगांनी पिकांवर मारा केला परंतु शेतकऱ्यांनी हिम्मत न हारता पिकांचे रक्षण केले शेतीतील पिकांना जवळपास 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस झाले आहेत सुरवातीच्या काळात शेतकऱ्यांनी पिकाला इतर खते दिली परंतु आता कापाशी व धानाला युरिया खतांची आवश्यकता आहे व कमकुवत गटांतील शेतकऱ्यांना महागडे खत परवडत नसल्याने ते युरियाचा वापर करून आपले पीक पिकवतात मात्र चिमूर तालुक्यातील कृषी केंद्रात कृषी केंद्र दुकानदार एकेरी युरिया शेतकऱ्यांना देत नाहीत इतर खते विकत घेतल्याशिवाय युरिया मिळत नाही.
मध्यम कालावधीत येणारे धान पीक सध्या तयार होत असून शेतकऱ्यांना युरियाची आवश्यकता पडत आहे परंतु कृषी दुकानात युरियाचा साठा नसल्याचे शेतकऱ्यांची पायपीट होत आहे काही कृषी केंद्रात युरियाचा साठा आहे परंतु इतर खते विकत घेतल्याशिवाय युरिया विकत नाहीत या बाबींवर चिमूर तालुक्यातील संबंधीत कृषी अधिकारी यांचे दुर्लक्ष आहे अनेक वृत्त पत्र व माध्यमांनी चिमूर तालुक्यातील युरिया खतांच्या तुटवड्या बाबतीत वृत्त प्रकाशित केले परंतु परिस्थिती आजही जैसे थे आहे कृषी अधिकारी यांच्या काहीच हालचाली नसून उलट त्यांचा कृषी केंद्रांना आशीर्वाद असल्याचे चित्र दिसत असून शेतकऱ्यांना कडून प्रचंड नाराजी व्यक्त होतांना दिसत आहे.