धाडीत ६ लाखचा सुगंधीत तंबाकू जप्त.
मजा, ईगल, व इतर तंबाखू, किराणा व्यवसायिकाला घेतले ताब्यात.
Bhairav Diwase. Sep 12, 2020
(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- चिमूर तालुक्यातील नेरी येथील प्रसिद्ध नूतन किराणा स्टोअरवर आज दि १२ सप्टेंबर रोजी साय,५:३० वाजता दरम्यान चंद्रपूर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाड पडली असून यात सुगंधीत तंबाखु जप्त करण्यात आले यात मजा ,ईगल, व इतर प्रकारचे सुगंधीत तंबाखू जप्त करण्यात आले असून नूतन किराणाचे मालक शगुलाब कामडी याना ताब्यात घेत यातील सुगंधी तम्बाकू ६लाख रुपये किंमतीचा असल्याचे सूत्रांकडून अंदाज व्यक्त करण्यात येत असून चिमूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद प्रक्रिया वृत्तलीहीस्तोवर सुरु होती .
सर्वत्र कोरोना महामारीचा कहर सुरू असून या कालावधीत चिमूर तालुक्यातील नेरी येथे अनेक दिवसांपासून सुगंधित तंबाखूची विक्री खुलेआम होत असते अशी माहिती चंद्रपूर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना (एल सी बी पथकाला )मिळाली होती परंतु आजपर्यंत त्यांना सुगंधित तंबाखू सापडले नाही नेरी परिसरात या सुगंधित तंबाखूचा गोरख धंदा बऱ्याच दिवसापासून सुरू आहे गुप्त रित्या या तंबाखुची खुलेआम विक्री होत होती परिसरात अनेक ठिकाणी हा तंबाखू जात होता आणि सर्रास विक्री होत होती परंतु सुराग मिळत नसल्याने पथक निरास होत होते .
परंतु आज दिनांक १२सप्टेंबर ला किराणा दुकानावर पाळत ठेवून आणि सापळा रचून अचानक सायंकाळी ५:३० वाजता एल सी बी पथकाने धाड टाकली आणि जवळपास ६ लाख रुपयांचा सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला असा अंदाज सूत्रांनी सांगितले असून किराना व्यवसायिकाला सुगंधित तंबाखू सहित ताब्यात घेण्यात आले असून वृत्तलिहेपर्यँय सुगंधित तंबाखु बदल कारवाई प्रक्रिया चिमूर पोलीस ठाण्यात सुरू होती.
♦ चिमूर शहरांतही मोठ्या प्रमाणावर सुगंधी तम्बाकूची विक्री ♦
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व पूर्वीही चिमूर शहरातील चारपाच दुकानात सुगंधी तम्बाकू विक्री सुरू होती लाकडाऊन मध्ये ६०० रूपयांचा माजा तम्बाकू डब्बा २-३हजार रुपये डब्बा विकण्यात आला तर आताही शहरातील या व्यवसायिकांनी किराणा दुकानाचा परवाना बनवून सुगंधी तंबाकू व ईतर बंदी असलेल्या वस्तू विकत आहे याकडेही अन्न व औषध प्रशासन ने व एल सी बी ने लक्ष वेधून कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.