पोंभुर्णा येथील मध्यवर्ती सहकारी बॅक शाखा व्यवस्थापक म्हणून सुभाष बुग्गावार म्हणून रुजु.

Bhairav Diwase

Bhairav Diwase. Sep 21, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- पोंभुर्णा येथील मध्यवर्ती सहकारी बॕंक शाखा पोंभुर्णा येथे शाखा व्यवस्थापक म्हणून सुभाष दामोधर बुग्गावार हे नुकतेच रुजु झाले आहेत. नुकतीच जिल्हा मध्यवर्ती बॕंक हि स्वतःच्या मालकीची ईमारत मध्ये स्थानांतरण झाले आहे. नविन ईमारत सुसज्ज आणि प्रशस्त आहे. जुन्या ईमारत मध्ये अपुऱ्या जागेमुळे खातेधारकांना खुप त्रास सहन करावा लागत होता. जनतेची हि अडचन लक्षात घेऊन संचालक मंडळानी नविन ईमारत बांधकामाला मजुंरी दिली. ऊमरी - बल्लारशा रोडवर बॕकेची प्रशस्त ईमारत लक्षवेधक आहे. नव्याने रुजु झालेले शाखा व्यवस्थापक सुभाष बुग्गावार यांनी तभाशी बोलतांना सांगीतले कि, खातेधारकांना पुरेपुर सुविधा देण्यात येईल आसे सांगीतले.