Bhairav Diwase. Sep 03, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) धनराज कोहळे रैयतवारी (जांब), सावली
सावली:- सावली शहरात आम आदमी पार्टीतर्फे नागरिकांचे ऑक्सिजन लेवल ऑक्सिमिटर द्वारे चेक करण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. याविषयी आम आदमी पार्टी सावली तसेच शहर शाखा सावली यांच्यातर्फे नगरपंचायत कार्यालय सावली, पोलीस स्टेशन सावली व शासकीय रुग्णालय सावली येथे प्रत्यक्ष निवेदन देण्यात आले. निवेदन देण्यापूर्वी उपस्थित नगराध्यक्ष विलासभाऊ यासलवार, पोलीस निरीक्षक राठोड साहेब तसेच उपस्थित अन्य कर्मचारी यांना ऑक्सिमिटर लावून चेक करण्यात आले. तसेच प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन आज दि. 02 सप्टेंबर ला मोहीम सुरू करण्यात आली. मोहीम सुरू करण्यासाठी आम आदमी पार्टीचे तालुका अध्यक्ष अनिल मडावी, सचिव जगदीश वासेकर आणि शहर शाखेचे अध्यक्ष राजूभाऊ सोनूले, महिला अध्यक्ष सोनाली भंडारे, शंकरभाऊ दुधे, पवनभाऊ मेश्राम, रंजिता नायडू, कुंदा गेडाम, सत्कार घडसे, दुर्गादास कन्नाके, बुद्धभूषण खोब्रागडे, विवेक भडके, मोहित दुधे, साहिल बांबोळे, रोहित आलेवार, प्रणय देशमुख तसेच इतर सदस्य आणि कार्यकर्ते उपस्थित होते.