विदर्भ राज्य युवा आघाडीची आढावा बैठक जिवती येथे संपन्न.

Bhairav Diwase
Bhairav Diwase.    Sep 03, 2020


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- विदर्भ राज्य युवा आघाडीच्या वतीने रोजगार हमी योजना आढावा घेत जिवती तालुक्यातील विकास कामाविषयी सभा आयोजित हि सभा जिवती येथील जिल्हा परिषद शाळेत घेण्यात आली असून यात शहर प्रमुख नियुक्ती व ऑटो रिक्षा चालक युनियन समस्या बाबत चर्चा करण्यात आली असून, अपंग व्यक्तींना शासनाकडून निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन विदर्भ राज्य युवा आघाडीचे अध्यक्ष मा. सुदाम भाऊ राठोड यांनी दिले.


तर जिवती तालुक्यांत रोजगार हमी योजना पुर्णपणे काम उपलब्ध करून देण्यात यावे असे आवाहन तहसीलदारांना निवेदन देऊन केले. यावेळी विदर्भ राज्य युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष अरविंद भाऊ चव्हाण, विनोद पवार, निलेश राठोड, सोनु जाधव, परमेश्र्वर चव्हाण, विशाल राठोड व सर्व कार्यर्कत्यांच्या उपस्थितीत ही सभा पार पडली