श्री.सुनिलजी उरकुडे सभापती कृषी व पशुसंवर्धन जिल्हा परिषद चंद्रपूर व श्री.राहुल संतोषवार सदस्य, जिल्हा परिषद चंद्रपूर, यांनी वैनगंगा नदीला आलेल्या महाभयंकर पुरामुळे नुकसान झालेल्या पिकांची केली पाहणी.

Bhairav Diwase
चक ठाणेवासना जि.प.शाळेत ठेवण्यात आलेलेल्या गंगापूर टोक येथील नागरिकांना स्वयंपाकाचे साहित्य व फळे देण्यात आले.
Bhairav Diwase.   Sep 03, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- गोसेखुर्द या धरनाचे पाणी सतत उत्सर्ग झाल्याने वैनगंगा नदी ला अतिशय पूर आले असल्याने पोंभुरणा तालुक्यातील कित्येक गावातील शेतीतील मुख्य पिकाचे अतिशय नुकसान झाले असल्याने या विधानसभा क्षेत्राचे लोकनेते मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार माजी अर्थ व नियोजन मंत्री तथा आमदार बल्लारपूर विधानसभा यांच्या मार्गदर्शनाखाली नुकसान झालेल्या  पिकाची पाहणी करताना श्री.सुनिलजी उरकुडे सभापती कृषी व पशुसंवर्धन जिल्हा परिषद चंद्रपूर व श्री.राहुल संतोषवार सदस्य जि.प. चंद्रपूर, यांंीन पोंभुर्णा तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या गंगापूर टोक हे गाव संपूर्ण पाण्याखाली आलेले असल्याने तेथील नागरिकाना चकठानेवासना येथील जिल्हा  परिषद शाळेमध्ये ठेवण्यात आले असल्याने त्यांना स्वयंपाकाचे साहित्य व फळे देण्यात येऊन झालेल्या पुर परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ उध्यापासून प्रत्यक्षात नुकसान ग्रस्त भागाचा सर्व्हे करून अहवाल जिल्हा स्तरावर पाठविण्याचे निर्देश देण्यात आले.  यावेळी उपस्थित श्री. गंगाधर मडावी सदस्य पंचायत समिती पोंभुर्णा, श्री. प्रभाकर पिंपळशेंडे, श्री.भगीरथजी पावडे, श्री.जयंत पिंपळशेंडे सरपंच ग्रामपंचायत चेक आष्टा, श्री. चंद्रशेखर झगडकर व इतर भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते..