Click Here...👇👇👇

श्री.राहुल संतोषवार सदस्य जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी बोर्डा झुल्लूरवार येथे कोरोना च्या पार्श्वभूमीवर दिली भेट.

Bhairav Diwase

मौजा बोर्डा झुल्लूरवार येथे श्री.राहुल संतोषवार सदस्य जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या उपस्थितीत संशयित व्यक्तीचे घेतले स्वाब नमुने.
Bhairav Diwase. Sep 07, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- पोंभुर्णा तालुक्यामध्ये कोरोना चा शिरकाव झालेला असतांना तालुक्यामध्ये कोरोना चे रुग्ण आढळून येत आहेत अशातच पोंभुर्णा तालुक्यातील बोर्डा झुल्लूरवार येथील कोरोना अहवालात पॉझिटिव रुग्ण आढळून आलेले आहेत.त्याच पाश्र्वभूमीवर श्री.राहुल संतोषवार सदस्य जिल्हा परिषद चंद्रपूर यांना ही बाब माहिती होताच त्यांनी बोर्डा झुल्लूरवार येथे जाऊन भेट घेतली. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी श्री.डॉ.मामिडवार साहेब यांना संशयित असलेल्या व्यक्तीचे स्वाब चे नमुने घेण्याकरीता आरोग्य विभाग पोंभुर्णा यांना निर्देश देण्यात आले. श्री.राहुल संतोषवार यांनी गावातील सर्व नागरिकांनी काळजी घेण्याचे आव्हान करण्यात आले.
सध्‍या कोरोना रूग्‍णांची संख्‍या दिवसेंदिवस वाढत असून अशावेळी खबरदारीचे उपाय म्‍हणून नागरिकानी, वारंवार हात धुणे, स्‍वच्‍छता राखणे अतिशय गरजेचे आहे नेहमी सतत आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी प्रशासनाला सहकार्य करावे प्रशासन नेहमी आपणास सहकार्य करेल असे आव्हान यावेळी करण्यात आले. उपस्थित श्री.गौतम रामटेके सरपंच ग्रा.प.बोर्डा झुल्लूरवार,श्री. संजय ढोंगे उपसरपंच ग्रा. प.बोर्डा झुल्लूरवार,श्री. बि. एम. पेंदोर ग्रामसेवक,श्री.मारोती कुंभरे, सदस्य श्री.उष्टुजी कुळमेथे इ. उपस्थित होते..