(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- काव्यप्रेमी शिक्षक मंच जिल्हा चंद्रपूर आयोजित जिल्हाध्यक्ष किशोर बळीराम चलाख यांची कन्या कु. समृद्धी हिच्या वाढदिवसानिमित्ताने चंद्रपूर जिल्ह्यातील कवी, कवयित्री यांच्यासाठी काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.वाढदिवसाचा होणारा निरर्थक खर्च टाळून विजेत्यांना भेटवस्तू देण्याचा संकल्प त्यांनी केला.या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये परमानंद जेंगठे यांचा प्रथम क्रमांक तर सुनील पोटे यांचा द्वितीय क्रमांक आला.अमोल मेश्राम तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले.विजेत्यांना व सहभागी स्पर्धकांना ऑनलाईन प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले तर विजेत्यांना भेटवस्तू देण्यात आली.सदर स्पर्धेसाठी काव्यप्रेमी शिक्षक मंचचे राज्याध्यक्ष आनंद घोडके यांनी मार्गदर्शन केले.स्पर्धेचे परीक्षण जस्मीन शेख,सांगली यांनी तर संकलन दुशांत निमकर यांनी केले. प्रदीप भुरसे यांनी प्रमाणपत्र निर्मिती केली.सर्व विजेत्यांचे अभिनंदन करण्यात आले.