Bhairav Diwase. Sep 08, 2020
कोरपना:- 04 एप्रिल रोजी श्री. दत्ता भिमराव मेश्राम यांना 06 महिने निलंबित करण्यात आले. व गावातील स्वस्त धान्य दुकान लगतच्या गावातील सोयाम यांना देण्यात आले. आज 06 महिने पूर्ण झाले ( निलंबित काळ) पण यांना आ. जिल्हा पुरवठा अधिकारी आर.आर. मिस्किन यांनी धान्य दुकानदारास रेशन वाटप करण्यासाठी दि. 05 आगस्ट रोजी परवानगी देण्यात आली. पण खरे पाहता त्यांची चौकशी व्हायला पाहिजे तसे न होता सरळ त्यांना वाटण्यास परवानगी देण्यात आली. तरी असे कळताच गावातील लोकांनी गावात सभा घेऊन सर्वांच्या अनुमतीने असे निर्णय काढण्यात आले की, श्री. दत्ता भिमराव मेश्राम यांचा परवाना रद्द करून नवीन राशन दुकानदारांची नियुक्ती करावी. पण आज (दी. 07 सप्टेंबर 2020) असे कळले की, धान्याची गाडी ही येणार आहे तर गावातील लोकांनी हे धान्य आम्ही स्वीकारू शकत नाही. म्हणून रस्त्यावर येऊन या गाडी ला गावात प्रवेश देणार नाही. बहिष्कार म्हणजे बहिष्कार हा नारा दिला. अनेक निवेदन देऊन सुद्धा तहसीलदाराने योग्य बाजू मांडून निर्णय घेत नसल्याचे स्पष्ट होत आहे.