कापसी येथे पिंजरे, कॅमेरे लाऊन प्रयत्न सुरू.
साखरी, सिर्शी, देवटोक, चक पेटगाव भागात वाघाचे दर्शन.
जगलालगत गावात भीतीचे वातावरण.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- सकाळी उठून व्यायाम करण्यासाठी गेलेल्या बालकाला बिबट्याने उचलून फरकटत नेऊन ठार केले सदर घटनेला पाच दिवसाचा कालावधी होत असताना त्या नर भक्षी बिबट्याला पकडण्यासाठी वनविभाग अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे मात्र त्या बिबट्याला पकडण्यासाठी मोठे प्रयत्न केले जात असून त्यासाठी क्यमेरे पिंजरा लावण्यात आलेला आहे असे वनविभागाकडून सांगितले जात आहे ही घटना ताजी असताना याच भागातील साखरी शीर्सी देवा टोक चक पेटग्गाव अश्या जंगला लागत असलेल्या गावात आज रोजी दर्शन झाले तर सिर्सी येथील देवा नावाने यांच्या घरी घुसून कोंबळ्या नेल्या त्यामुळे या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दि. 9 रोजी पहाटे 5.30 वाजता कापसी ते व्याहळ मार्गे नियत शेत्र सामदा राखीव वण कक्ष क. 293 लागत असलेल्या कापसी व्याहाळ मार्गे मित्रासोबत एक किमी अंतर फिरण्यासाठी आलेल्या संस्कार बुरले 12 वर्ष याला बिबट्याने उचलून फरकटत नेऊन रस्त्यापासून पूर्वेस 700 मीटर नेऊन ठार केले त्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले मृतकाचे कुटुंबाला तातकाळ 25000 रू मदत देण्यात आली बालकाचा बळी घेणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात यावे अशी मागणी असताना ही पाच दिवसाचा कालावधी लोटत असताना त्या नारभक्षी बिबट्याला पकडण्यासाठी वनविभाग अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे मात्र बिबट्याला पकडण्यासाठी क्यामेरा पिंजरा लावण्यात येऊन मोठा प्रयत्न सुरू असल्याचे वण विभागाकडून सांगण्यात येत आहे वन्य जीव वाघाचे या भागात प्रमाण वाढले असून नेहमीच या भागात वाघाचे दर्शन तर कधी वाघ आणि माणसात संगर्ष होताना दिसतो तालुक्यातील अनेक गाव जंगल व्यपत असून हा भाग जंगली हिंस्र पशू चे वावर असून नेहमीच अश्या घटना घडल्या जातात घटनेच्या दिवशी कापसी येथिल काही लोक त्यात बालकांचाही समावेश आशि मंडळी कापसी ते व्याहाळ मार्गे एक किमी अंतर फिरण्यासाठी गेले होते पैकी मृतक आणि त्याचा मित्र मंथन भांडेकर हे दोगच समोर जाऊन व्यायाम करीत असताना रास्त्या लागत झुडपी जंगलात दबा धरून बसले ल्या बिबट्याने मृतकावर हाला करून ठार केले होते मात्र अजूनही त्या बिबट्याला जेरबंद करण्यात आले नसून साखरी सर्सी देव टोक चक पेटगाव आदी गावात वाघाचे दर्शन झाल्याने आणि सिसी येथील देवा बावणे यांच्या घरातून कोंबल्या वाघाने नेल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बिबट्यालाजेरबंद करण्यात यावे अशी मागणी धरत आहे.