जिल्हा परिषद अध्यक्षा यांच्यातर्फे पूरग्रस्त भागाची पाहणी.

Bhairav Diwase
पाहणी करताना नायब तहसीलदार, महसूल विभाग, कृषी विभाग, पंचायत समिती तसेच इतर अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती.
Bhairav Diwase.    Sep 05, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) धनराज कोहळे रैयतवारी (जांब), सावली
सावली:- दोन दिवसांपूर्वीच येऊन गेलेल्या वैनगंगेच्या पुरामुळे झालेल्या नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. संध्याताई गुरनुले यांनी प्रत्यक्ष ठिकाणी हजर झाल्या.  गोसिखुर्द धरणाचे पूर्ण गेट मोकळे केल्यामुळे वैनगंगा नदी ही पूर्णपणे भरून आली. पाण्याचा प्रवाह इतका होता की नदीकाठच्या शेतशिवारात तसेच गावात पुराचे पाणी शिरले. यामध्ये सावली तालुक्यातील नदीकाठची विविध गावे आणि शेती यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. यांमध्ये धान, कापूस, सोयाबीन, तूर तसेच इतर पिकांची लागवड करण्यात आलेली होती. परंतु पाऊस नसतानाही आलेल्या या पुरामुळे सम्पूर्ण उभ्या पिकांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. या झालेल्या नुकसानीचे प्रत्यक्ष आपल्या उपस्थितीने पाहणी करण्यासाठी आज दि. 05 सप्टेंबर ला जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. संध्याताई गुरनुले यांनी सावली तालुक्यातील गावांना भेट देऊन पाहणी केली. त्यांच्यासोबत संतोष सा. तंगडपल्लीवार माजी बांधकाम सभापती जि.प. चंद्रपुर, चंदु मारगोनवार सभापती पं.स. मुल, सतीश बोम्मावार महामंञी भाजपा सावली, सौ. छायाताई शेन्डे माजी सभापती पं.स. सावली, निलकंठ भोयर सरपंच ग्रा.पं जिबगांव, राकेश एम. गोलेपल्लीवार प्रहार सेवक जिबगांव, विनोद धोटे, अरुन पाल, दिलीप चुदरी, राजु देशमुख तसेच कांबळे साहेब नायब तहसीलदार सावली, भोसले साहेब संवर्ग विकास अधिकारी पं.स. सावली, कृषी अधिकारी यांचेसह इतरही अधिकारी आणि कर्मचारी वर्गाची उपस्थिती होती. तसेच शेतकरी वर्ग सुध्या खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. भेटीदरम्यान प्रहार सेवक राकेश गोलेपल्लीवार यांनी जि.अध्यक्ष यांना झालेल्या पीकाच्या नुकसान भरपाई साठी हेक्टरी तीस हजार रुपये द्यावे असे सांगितले.
        तसेच निवेदनाद्वारे त्यांनी जीबगाव येथे बांधण्यात आलेल्या प्राथमिक रुग्णालयाच्या इमारतीचे लवकरात लवकर उद्घाटन करून आजूबाजूच्या लोकांना आरोग्याची उत्तम सेवा मिळवून द्यावी, रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम, नाली बांधकाम करून रुग्णालय लवकर सुरू करावे असे निवेदन दिले.