केंद्र सरकारची परवानगी मिळाली:- पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार
Bhairav Diwase. Sep 05, 2020
चंद्रपूरः- जिल्ह्यात वाढते कोरोना रूग्ण आणि मृत्यूसंख्या लक्षात घेता जिल्ह्यात समूह संसर्गाची भिती व्यक्त होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी, व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधीशी जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चा करून येत्या बुधवार पासून जिल्ह्यात जनता कपर्यु लागू करावा, असे निर्देश राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी आज दि .५ सप्टेंबरला | जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. जनता कर्फ्य संदर्भात केंद्र सरकारची परवानगी मिळाली असल्याचे त्यांनी सांगीतले .
चंद्रपूर जिल्ह्यात आज 195 कोरोना पॉझिटिव रुग्णांची नोंद.