पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला,
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,
पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा....
चंद्रपूर , गडचिरोली , भंडारा जिल्ह्यातील भीषण पूरपरिस्थिती बघताना , पूरग्रस्तांच्या डोळ्यातील महापूर बघताना , त्यांच्या चेहऱ्यावरील दुःख , वेदना बघताना कुसुमाग्रजांची कणा कविता आठवली. पूरग्रस्तांचे दुःख मोठे आहे , ते शब्दांनी दूर होणार नाही याची कल्पना त्यांना होती पण तरीही लोकप्रतिनिधी म्हणून आपले कर्तव्य बजावण्यासाठी ते तिथे पोचले. पूरग्रस्तांना भेटले .त्यांच्या व्यथा वेदना जाणून घेतल्या. तेथूनच सचिवांना दूरध्वनीवरून सूचना , मागण्या त्यांनी केल्या. आभाळ फाटलय म्हणून शिवायचंच नाही हा त्यांचा स्वभावच नाही , ते सरसावले . शासनापर्यन्त पूरग्रस्तांचा होऊन .हा कर्तव्यकठोर लोकप्रतिनिधी म्हणजे आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार !!
गोसेखुर्द चे दरवाजे उघडण्यापूर्वी पूर्वसूचना देता आली नाही ? असा सवाल करत हे संकट अस्मानी असले तरी यात मानवाचा दोष अर्थात शासन व प्रशासनाचा दोष जास्त आहे असं त्यांनी ठणकावून सांगितलं .आता कंजूषपणा करू नका तातडीने मदत द्या अशी मागणीच त्यांनी केली नाही तर त्यांचे इमेल्स सुद्धा शासन दरबारी धडकले . कोल्हापूर , सांगली भागात 2019 मध्ये महापूर आला तेव्हा मदतीबाबत जो शासन निर्णय तत्कालीन शासनाने काढला त्यातील तरतुदी लागू करण्याची मागणी करताना आता इथं राजकारण करू नका असं विद्यमान राज्यकर्त्यांना त्यांनी सुनावलं . जुन्या सरकारचा निर्णय उत्तम असला तरी तो बदलायचाच असा महाविकास आधाडीचा खाक्या असल्यामुळे सुधीरभाउंनी सरकारला ताकीदच दिली. करायची म्हणून मदत करू नका ती वाढवा असं सांगत आता या परिस्थितीत पूरग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसत त्यांची थट्टा केली तर याद राखा असंही ते परखडपणे म्हणाले.
गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली,
मोकळ्या हाती जाईल कशी- बायको मात्र वाचली
भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले,
प्रसाद म्हणून पापण्यांमधे पाणी थोडे ठेवले..
वैनगंगा काय आणि गंगा काय .. लेखदोघीही सारख्याच. आता विझलेली चूल कशी पेटेल , खचलेली भिंत कशी उभी राहील या चिंतेत असलेल्या पूरग्रस्तांना धीर देत आम्ही खंबीरपणे तुमच्या सोबत आहोत अशी ग्वाही सुधीरभाऊंनी दिली. भाजपच्या पदाधिकाऱ्यांना , कार्यकर्त्यांना तातडीने निर्देश देत मदतकार्यात कसूर होणार नाही , काहीही कमी पडणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. एका लोकप्रतिनिधीची तत्परता, संवेदनशीलता पूरग्रस्त नागरिकांनी अनुभवली. आता मदत जाहीर होईपर्यंत , प्रत्यक्ष मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील असे जाहीर करत ते माघारी निघाले. पूरग्रस्तांच्या पाणावलेल्या डोळ्यांत एक चमक दिसली...विश्वासाची. सुधीरभाऊंचे एक वाक्य ...जर शासन कमी पडेल तर आम्ही शासन होऊ पण खचू नका , धीर सोडू नका....किती बळ मिळालं असेल त्या विझलेल्या मनांना !!
फक्त लढ म्हणायला आले नव्हते तर त्यांच्या सोबत लढा द्यायला आले होते सुधीरभाऊ !!!
*मंगेश गोवर्धन*