माजी आमदार अँड संजय धोटे यांची प्रामुख्याने उपस्थिती.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी राजुरा तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, माजी आमदार अँड संजय धोटे यांच्या जनसंपर्क कार्यालयात सकाळी 10 वाजता ध्वजारोहण करण्यात आले होते,तसेच माजी आमदार अँड संजय धोटे यांच्या प्रमुख उपस्थिती दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले व त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला,तसेच माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने माजी आमदार अँड संजय धोटे यांच्या उपस्थितीत बैंक ऑफ इंडिया राजुरा तसेच उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे सॅनिटायझर मशीनचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.यावेळी पायाने अपंग असलेल्या व्यक्तीला काठी देण्यात आली,
यावेळी माजी आमदार अँड संजय धोटे यांच्या सह जिल्हा परिषद सभापती सुनिल उरकुडे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अरुण मस्की,आदिवासी नेते वाघुजी गेडाम,भाजपा नेते विनायक देशमुख,भाजपा जिल्हा कार्यकारणी सदस्य सुरेश रागीट,नगरसेवक राधेश्याम अडाणीया,भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे,महादेव तपासे,भाजपा युवा नेते गणेश रेकलवार,भाजयुमो तालुका महामंत्री रवि बुरडकर,महेश रेंगुडवार,कैलास कार्लेकर,संदीप मडावी,अजय बांदूरकर आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.