पं दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त कु अल्का आत्राम यांनी विविध उपक्रम करून जयंती साजरी.

Bhairav Diwase
दिव्यांगाना ब्लाँकेटचे वाटप, अनाथ व गरजूंना किट वाटप, पं स सफाई कर्मचारी यांचा साळी चोळी आणि कपडे देऊन सन्मान.
Bhairav Diwase. Sep 25, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- एकात्मता मानवतावादाचे प्रणेते पं दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त कु अल्का आत्राम यांनी विविध उपक्रम करून जयंती साजरी करण्यात आली. दिव्यांगाना ब्लाँकेटचे वाटप करण्यात आले तसेच अनाथ व गरजूंना सामान किट वाटप करण्यात आले आणि प स सफाई कर्मचारी यांचा साळी चोळी आणि कपडे देऊन सन्मान करण्यात आला.


भिमणी येथे रणजित पिंपळशेडे यांचे कडुन नोटबुक वितरण करण्यात आले. यावेळी मनोज मुल्कलवार, गौतम रामटेके, पुरुषोत्तम गव्हारे, श्यामसुंदर नैताम, जयंत पिपंळशेडे, भैरव दिवसे, श्रीकांत वडस्कर, नितिन धोडरे, नानाजी टेकाम, बंडु लेनगुरे, बोळेकर गौरकार, रणजित पिंपळशेडे गणपत फरकडे राहुल वासेकर उपस्थित होते.