Click Here...👇👇👇

केमारा- देवाडा जिल्हा परिषद क्षेत्राचे सदस्य श्री राहुलभाऊ संतोषवार यांनी दिली जाम खुर्द येथे भेट.

Bhairav Diwase
नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे:- श्री राहुलभाऊ संतोषवार 
Bhairav Diwase.    Sep 05, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- पोंभुर्णा तालुक्यामध्ये कोरोना शिरकाव झालेला आहे. तालुक्यामध्ये पण कोरोना चे रुग्ण आढळून आले आहेत. तर खेड्यापाड्यांमध्ये पण कोरोनाने शिरकाव केल्याचे दिसून येत आहे. पोंभुर्णा तालुक्यातील जाम खुर्द देते कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्याच पार्श्वभूमीवर केमारा- देवाडा जिल्हा परिषद क्षेत्राचे सदस्य श्री राहुलभाऊ संतोषवार यांना ही बाब माहिती झाली. तसेच त्यांनी त्वरित जाम खुर्द गाठत जाम खुर्द येथे भेट दिली. व नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले. यावेळी जाम खुर्द चे सरपंच बंडू बुरांडे व नागरिक उपस्थित होते.