स्वयंस्फूर्तीने दुग्धजन्य पदार्थाची कार्यशाळा संपन्न

Bhairav Diwase
कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीच्या माध्यमातून गावकऱ्यांशी संवाद.
Bhairav Diwase.    Sep 20, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- यवतमाळ येथील मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालयाची विद्यार्थीनि दिव्या गेडाम हिने ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत चार्ली येथील शेतकऱ्यांची नुकतीच कार्यशाळा घेतली. दूध देणाऱ्या गाई , म्हशी चे दूध वाढविण्यासाठी चाऱ्याचे प्रमाण व दुधाचे नियोजन  कशा प्रकारे करावे. दुधापासून तयार होणारे पदार्थ आणि शासनाकडून मिळणाऱ्या योजनेबद्दल सविस्तर माहिती ही या वेळी देण्यात आली.
       दुधाचे अधिक उत्पादन करून त्यापासून अनेक पदार्थ तयार करून ही व्यवसाय करू शकतो याची प्रचिती या वेळी शेतकऱ्यांना करून देण्यात आली. कार्यशाळेला उपस्थित महिलांना दुधापासून विविध पदार्थ कसे तयार करतात याचे प्रात्यक्षिक दिव्याने दिले.
कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.ए. ठाकरे, उप प्रचार्य मंगेश कडू, प्रा. स्नेहल लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
या वेळी गावच्या उपसरपंच सावित्री पंधरे , सुषमा पंधरे , मीरा गेडाम , संध्या कोराम तथा गावातील महिला उपस्थित होत्या.
        आपल्या शिक्षणाचा उपयोग तळागाळातील शेतकऱ्यांसाठी करत असताना दिव्या ने घेतलेल्या या मोफत कार्यशाळेचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.