चंद्रपूर जिल्ह्यात NPS वर सामूहीक बहिष्कार.
Bhairav Diwase. Sep 09, 2020
चंद्रपूर:- १ नोव्हेबर २००५ नंतर सेवेत आलेल्या शासकीय,निमशासकीय,राज्य सरकारी कर्मचाऱ्याना परिभाषित अंशदान निवृतिवेतन योजना (DCPS)लागू करण्यात आली होती.सदर योजना ही केंद्र शासनाच्या NPS योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात लागू करण्यात आली.१५ वर्ष DCPS मधे असल्यानंतर राज्य सरकार आता ती योजना NPS मधे कन्वर्ट करीत असल्याने शिक्षक,कर्मचारी यांच्यात संभ्रम निर्माण झाला यासाठी ८ सप्टेबरला गूगल मिट द्वारे ऑनलाइन सभा घेऊन शंकेचे निरसन करून NPS चे CSRF फॉर्म भरून न देण्याचे एकमुखी ठराव चंद्रपुर जिल्हा जूनी पेंशन हक्क संघटनेने घेतला आहे.
चंद्रपुर जिल्ह्यातील भविष्य निर्वाह निधी व वेतन पथकाने जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक,माध्यमिक शाळांतील DCPS धारकांना सक्तीने, कोरोनाच्या प्रादुर्भावात NPS चे फॉर्म भरून घेत आहेत.यासाठी जिल्ह्यातील शिक्षकामधे भरावे की भरू नये??असा संभ्रम निर्माण झाला त्यामुळे अगोदर DCPS मधे झालेल्या रकमेचा हिशोब नाही,NPS मधे किती पेंशन मिळेल??याबाबत अनिश्चितता आहे.अगोदरच DCPS मधे पैसे गुंतवून १५ वर्षांनंतर NPS चे खाते खोलण्याची कारणे काय??केंद्र शासनाच्या NPS धारकांना मयत झाल्यानंतर अतिरिक्त लाभ म्हणून फैमिली पेंशन व ग्रैच्युटी चा लाभ मिळतो पण राज्य शासनाच्या NPS धारकास लाभ दिला जात नाही असा भेद निर्माण केला आहे.त्यासाठी गूगल मीट द्वारे ऑनलाइन सभा घेऊन फैमिली पेंशन,ग्रेच्युटी व हिशोब मिळल्याशिवाय NPS चे फॉर्म भरून न देण्याचा एकमुखी ठराव घेतला आहे.
चंद्रपुर जिल्ह्यातील सामान्य शिक्षकांचे प्रश्न,समस्या,NPS चे तोटे याबाबत सांगोपांग चर्चा करण्यात आली. सर्व समस्याचे निराकरण करण्यात महाराष्ट्र राज्य जूनी पेंशन हक्क संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर,सचिव गोविंद उगले,राज्य सल्लागार सुनील दुधे,राज्य प्रवक्ते शिवाजी खुडे,राज्य कार्याध्यक्ष सर्जेराव सुतार,कार्यालयीन सचिव शैलेश राऊत,विश्वस्त प्रविण पाताड़े,नागपुर विभाग अध्यक्ष आशुतोष चौधरी या सर्वानी शंकेचे निरसन केले. गूगल मीट द्वारे 93 सभासदांनी सहभाग दर्शवून विविध शंका-कुशंका विचारण्यात आल्या. ज्या बाबी शासनाने कार्यशाळा आयोजित करुण NPS बाबत मार्गदर्शन द्यायला हवे.परंतू भविष्यात DCPS योजनेसरख्या समस्या उद्भभवू नये यासाठी सेवानिवृती नंतर किती पेंशन मिळणार?? या संदर्भात अनिश्चितता आहे.जोपर्यंत केन्द्राच्या NPS धारकांप्रमाणे राज्य सरकारने फैमिली पेंशन व ग्रैच्युटी या जुन्या पेंशनमधील तरतूदी लागू करणार नाही.तोपर्यंत NPS चे CSRF फॉर्म न भरण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष दुशांत निमकर जिल्हासचिव निलेश कुमरे जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत खुसपुरे, जिल्हा कोषाध्यक्ष जितेंद्र बल्की,देव कुईटे, मंगेश साखरकर,संतोष वाटगुरे,भालचंद्र धांडे,महादेव मुनावत व इतर पदाधिकारी जूनी पेंशन हक्क संघटनेचे शिलेदार यांनी केले आहे.