विश्वास बसत नसेल तर पहा व्हायरल व्हिडिओ.
Bhairav Diwase. Oct 24, 2020
दसरा हा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. एक दिवस आधीपासूनच दसऱ्याच्या तयारीला सुरुवात झाली आहे. रावणदहनासाठी सर्वत्र पुतळे उभे केले जात आहे. मात्र यंदा कोरोनामुळे दरवर्षीचा उत्साह दिसणार नाही. मात्र यातच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये दसऱ्याआधी रावण अॅम्ब्युलन्सवर जाताना दिसत आहे.
हेही वाचा:- गडचिरोली -चंद्रपूर मार्गावर वैनगंगा नदीत प्रेमीयुगलांनी मारली उडी.....
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. तर, काही लोकांना 2020मध्ये आता हेच शिल्लक होतं अशी प्रतिक्रिया दिली आहे. हा मजेदार व्हिडीओ IFS ऑफिसर सुशांत नंदा यांनी शेअर केला आहे.
हा व्हिडीओ शेअर करताना सुशांत नंदा यांनी, अॅम्ब्युलन्सवर बसून रावणही कोव्हिड-19 रुग्णालयात जात आहे, असे कॅप्शन दिले आहे.
हेही वाचा:- अखेर 32 तासानंतर मुलाचा मृतदेह सापडला, तर मुलीच्या मृतदेहाचा शोध सुरू. https://www.adharnewsnetwork.com/2020/10/32.html?m=1
हा व्हिडीओ पाहून लोकं हैराण झाले आहे. लोकांनी 2020मध्ये काहीही होऊ शकतं अशी प्रतिक्रिया दिली आहे. या व्हिडीओमध्ये एका अॅम्ब्युलन्सवर रावणाचा पुतळा दिसत आहे. अॅम्ब्युलन्समधून हा रावणाचा पुतळा दहनासाठी घेऊन जाताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
काही लोकांनी हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता रावणालाही पण कोरोना झाला की काय? असेही प्रश्न विचारले आहेत.
हेही वाचा:- दारू पाजून अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार.