राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Oct 02, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा येथील राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 151 वी व स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची 116 वी जयंती चा कार्यक्रम घेण्यात आला.
   यावेळी दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून स्मृतीस अभिवादन करण्यात आले.
   या कोविड 19 महामारी काळात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वानी मास्क लावून व सॅनिटाईझर चा वापर करून हा कार्यक्रम घेण्यात आला.
      यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. खेराणी सर, कार्यक्रम अधिकारी प्रा. गुरुदास बलकी, डॉ. सारिका साबळे, सोबतच डॉ. व्यंकटरमना, डॉ. दुधे, डॉ. रायपुरे, डॉ. डांगे, प्रा. नलगे, प्रा. आत्राम व अन्य प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.