(आधार न्यूज नेटवर्क शहर प्रतिनिधी) पंकज रामटेके, घुग्घुस
चंद्रपूर:- भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी व जय-जवान जय-किसानचा नारा देणारे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती जनता विद्यालय साखरवाही येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. मोहन गंधारे सर होते.
महात्मा गांधीजींच्या व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. उपस्थित सर्व शिक्षकांनी सुद्धा पुष्प अर्पण करुन प्रतिमेला अभिवादन केले.
याप्रसंगी विचार व्यक्त करताना शाळेचे मुख्याध्यापक मोहन गंधारे सर म्हणाले की राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारावरच भारतातील प्रत्येक व्यक्तिने चालले पाहिजे किंबहुना त्यांच्याच विचारांमध्ये प्रगतशील भारताचा आत्मा लपलेला आहे. प्रत्येकाने त्यांच्या जीवन कार्यातून प्रेरणा घेऊन सत्याच्या मार्गाने जीवन कंठीत केले पाहिजे.
याप्रसंगी उपस्थितांना जयंतीचे औचित्य साधून सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाला विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक श्री. वामन खंगार, श्री. ओमप्रकाश पिपरे, श्री. विवेक बोढे, श्री. रवींद्र जेनेकर, श्री. बंडू बर्डे, श्री. अजय आगलावे, श्री. परशुराम येडे, श्री. घनश्याम काकडे, श्री. पंकज कोकमवार, कु. निर्मलाताई बोबडे, श्री. अनुप वदनलवार आदींची उपस्थिती होती.