चंद्रपूर:- घुग्घुस येथील पंचायत समितीचे माजी सभापती व काँग्रेसचे नेते रोशन पचारे याची चंद्रपूर किसान काँग्रेसच्या जिल्हाअध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
हि नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे अध्यक्ष देवानंद पवार यांनी केली आहे.
नियुक्ती पत्र देतांना महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे अध्यक्ष देवानंद पवार, महाराष्ट्र विधान सभेचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले व काँग्रेसचे जेष्ठ नेते उपस्थित होते.
घुग्घुस येथील रोशन पचारे यांनी काँग्रेस शहरअध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, पंचायत समिती सभापती अशी पदे भुषविली आहे.
चंद्रपूर किसान काँग्रेसच्या जिल्हाअध्यक्ष पदी रोशन पचारे यांची निवड झाल्याने काँग्रेस पक्षात व कार्यकर्त्यात उत्साह आहे. त्यांचा नियुक्ती चे घुग्घुस काँग्रेस कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे व पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या आहे.