Bhairav Diwase. Oct 04, 2020
महाराष्ट्र:- केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकावरून देशभरात ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे. महाविकास आघाडी सरकारनेही कृषी विधेयकावर आक्षेप घेत विरोध दर्शवला आहे. त्यातच राज्य शिक्षणमंत्री आ. बच्चू कडू यांनी 'जर मोदींनी त्या दोन ओळी कृषी विधेयकात टाकल्या तर भाजपात प्रवेश करू', असे आव्हानच दिले आहे.
राज्य शिक्षणमंत्री आ. बच्चू कडू यांनी कृषी विधेयकावर आपली भूमिका स्पष्ट केली. 'आम्ही हे बिल जसेच्या तसे स्वीकारायला तयार आहोत, पंतप्रधान मोदी जसे 56 इंच छाती असल्याचे सांगतात. त्याप्रमाणे त्यांनी या विधेयकामध्ये केवळ दोन ओळी टाकाव्यात. शेतकऱ्यांना 50 टक्के नफा धरून भाव देऊ व याच भावात शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करू, असं केल्यास मी भाजपात प्रवेश करेल, असं राज्य शिक्षणमंत्री आ. बच्चू कडूं यांनी सांगितले.