Top News

कोसा उत्पादक शेतकर्यांची आम आदमी पार्टीने घेतली दखल.

Bhairav Diwase.      Oct 30 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) प्रफुल तुम्मे पाथरी, सावली
सावली:- जिल्ह्यात सावली व ब्रम्हपुरी तालुक्यातील काही गावात रेशीम शेती केली जाते परंतु या वर्गाकडे प्रशासनाचे नेहमी दुर्लक्ष होत असते. अशातच याही वर्षी सावली तालुक्यातील जिभगांव येथील काही राणकर्यानी कोसाची (रेशीम ) लागवड केली. परंतु निसर्गाच्या लहरीपणामूळे यांची शेती पूर्णतः बुडाली यामध्ये राणकरी बांधवांची मोठ्याप्रमाणात नुकसान झाली तरी पण प्रशासन याकडे लक्ष देत नव्हते. 
 दिनांक 29/10/2020 रोजी कोसा उत्पादक शेतकऱ्यांनी आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश सदस्या ॲड पारोमिताताई गोस्वामी यांना आप बिती सांगीतली असता दिनांक ३० नोव्हेंबरला आम आदमी पार्टीचे सावली तालुका अध्यक्ष श्री अनिल मडावी यांनी शिष्टमंडळ घेवून रेशीम विकास अधिकारी यांची भेट घेतली व कोसा उत्पादक शेतकऱ्यांना कोसा उत्पादनाची झालेली नुकसान भरपाई देण्याची मागणी लावून धरली असता रेशीम विकास अधिकारी श्री अवार्ड साहेब यांनी नुकसान भरपाईसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा करण्याचे मान्य करत . दिनांक २ नोव्हेंबरला शेतर्यांच्या बांधावर जावून कोसा उत्पादनाच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून त्याला रेशीम कार्यालयाचा तांत्रिक रिपोर्ट जोडून जिल्हाधिकारी यांचेकडे प्रस्ताव पाठवणार असल्याचे आश्वासन दिले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने