माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य, भाजपा जिल्हाध्यक्ष देवरावभाऊ भोंगळे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न.
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) किशोर माहोरकर फुटाना, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत ग्रामपंचायत चकफूटाना येथे vstf अंतर्गत विशेष प्रकल्प अंतर्गत वाचनालय इमारतीचे लोकार्पण सोहळा तसेच ग्रामपंचायत सदस्यांचा कार्यकाळ समाप्तीबद्दल त्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य देवरावभाऊ भोंगळे,अध्यक्ष म्हणून पंचायत समिती सभापती मा.अल्काताई आत्राम तर प्रमुख पाहुणे म्हणून विनोदभाऊ देशमुख मा.उपसभापती व सदस्य पं.स पोंभुर्णा, मा.गंगाधर जी मडावी सदस्य पं.स पोंभुर्णा, गजानन गोरंटीवार भाजपा तालुकाध्यक्ष, नगरसेवक, माजी नगराध्यक्ष न.प.पोंभुर्णा, अजय मस्के भा.ज.यु.मो. तालुकाध्यक्ष, महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे जिल्हा समन्वयक विद्या पाल मॅडम, यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये हा सोहळा पार पडला.
सत्कारमूर्ती म्हणून ग्रामपंचायत सरपंच मा. तुळशीराम जी रोहनकर यांचा सत्कार मा. देवरावभाऊ भोंगळे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांच्या पाच वर्षातील यशस्वी कारकीर्द वर प्रकाश टाकण्यात आला. त्यांच्या काळात झालेल्या विकास कामे, गावात झालेला परिवर्तन, एक आदर्श सरपंच म्हणून केलेले कार्य, गावाचा सर्वांगीण विकास व ग्रामविकासाची तळमळ अश्या अनेक भूमिका त्यांनी पार पडला असे पाहुण्यानी आपल्या भाषणातून भावना व्यक्त केल्या. त्याच प्रमाणे त्यांचे सहकारी सदस्य उपसरपंच कोमल ताई संदेश झाडे, प्रभाकर रामगिरकर, नीलिमा नेरू मोरे, सुवर्णा रामदास झोडे, मंजुषा संजय सोनटक्के, गणेश रामदास अर्जुनकर यांचा सपत्नीक शाल व श्रीफळ देऊन पाहुण्याच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच गावासाठी रात्रंदिवस सेवा देणारे ग्रामपंचायत शिपाई डोमाजी तानु देऊरघरे हे सेवानिवृत्त होत असल्याने यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.
मा.देवरामभाऊ भोंगळे, तुळशीराम जी रोहनकर,अजयदादा मस्के यांचे हस्ते वाचनालयाला एक एक फोटो भेटस्वरूप देण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपरिवर्तक धर्मेंद्र घरत, प्रास्ताविक मॅजिक बस चे तालुका व्यवस्थापक हिराचंद रोहनकर तर आभार सोनूले सर,यांनी मानले.कार्यक्रमाला गावातील सर्व गावकरी वृंद उपस्थित होते.