(आधार न्यूज नेटवर्क शहर प्रतिनिधी) पंकज रामटेके, घुग्घुस, चंद्रपुर
चंद्रपूर:- घुग्गुस जवळच्या नकोडा येथील राकेश गुतकोंडावर (35)हा एसीसी येथे कंत्राटी कामगार असून तो एलसी एस डब्ल्यूसीएल क्वार्टर वॉर्ड क्रमांक 3 नकोडा येथील रहिवासी असून तो सकाळी 9.30 वाजता दरम्यान घरून निघून गेला असता त्याचा मृतदेह वर्धा नदीच्या घाटावर असलेल्या राममंदिर परिसरात झाडाला गळफास घेतल्याचे आढळून आले, याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटना स्थळावर जाऊन पंचनामा केला व मर्ग दाखल करून चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनाकरीता पाठविण्यात आले. पुढील तपास घुग्गुस पोलीस करित आहे.