Click Here...👇👇👇

घुग्घुस पोलिसांच्या अजब खाक्या तिन ट्रँक्टर जप्तीच्या कारवाहीतील एक ट्रँक्टर सोडले.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Oct 06, 2020
(आधार न्यूज नेटवर्क शहर प्रतिनिधी) पंकज रामटेके, घुग्घुस
चंद्रपूर:- सोमवारला सकाळी १० वाजता घुग्घुस पोलीसांना अवैध रेती तस्करीची होत असल्याची माहिती मिळताच वर्धा नदीच्या घाटावर धाड टाकुन तिन ट्रँक्टर जप्त केले. 
घुग्घुस पोलीसांनी ट्रँक्टर चालक महेश वसंत कामतवार (२४) रा. अमराई, घुग्घुस व मारोती नानाजी मोहुर्ले (२५) रा. अमराई, घुग्घुस यांच्यावर कलम ३७९ चा गुन्हा दाखल करुन अटक केली.
मंगळवारला ११ वाजता ट्रँक्टर मालक पिंटु विश्वनाथन लोढे व विजय सिंग या फरार असलेल्या दोघांना अटक केली आहे. 


२ ट्रँक्टर व २ ट्राली आणी २ ब्रास रेती असा एकुण १० लाख १० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. या कारवाहीतील
एक ट्रँक्टर ओबीचे असल्याने जप्त करण्यात आलेले सोमवारला सोडण्यात आले. दंड वसूल न करता एक ट्रँक्टर ओबीचे सोडण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
अर्थपूर्ण व्यवहारातुन एक ओबीचे ट्रँक्टर सोडल्याचे बोलले जात आहे.