विचोडा (बू) येथील वाघाच्या हल्यात १ बैल ठार तर १ बैल गंभीर जखमी.

Bhairav Diwase
शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई तात्काळ मध्ये देण्यात यावी:- श्री अनिल डोंगरे तालुका अध्यक्ष भा. ज. यू. मो चंद्रपूर
Bhairav Diwase. Oct 01, 2020


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- चंद्रपूर वरून जवळच तसेच चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राला लागून असलेल्या मौजा विचोडा (बू) येथील श्री.नागेंद्र गरगले यांच्या मालकीचे बैल जोडी सायं ६ ते ६.३० च्या दरम्यान चरावयास सोडले असता त्या बैलावर वाघाने हमला करून १ बैल जागीच ठार मारला तर १बैल गंभीर जखमी असून गावा परिसरातील भीतीचे वातावरण झाले आहे या दोन्ही बैलाची किंमत जवळपास एक लाख पन्नास हजार एवढी आहे शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून तसेच शेतीच्या दिवसात शेतकऱ्यांना बैल नसल्यामुळे शेतीत नापीक होणार असून अश्याप्रकारे शेतकरी हा दुहेरी संकटात सापडला आहे. या शेतकऱ्यांना बैल तसेच शेतीच्या नापिकीची अशी डबल नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यात यावी तसेच त्या वाघाला जेरबंद करण्यात यावे अशी मागणी श्री. अनिल डोंगरे तालुका अध्यक्ष भा. ज. यू. मो.चंद्रपूर यांनी केली आहे.