Top News

नवीन शेती विषयक कायदे नको.

घुग्घुस काँग्रेस कमेटीच्या वतिने वेबीनार संमेलन संपन्न.
Bhairav Diwase. Oct 16, 2020
(आधार न्यूज नेटवर्क शहर प्रतिनिधी) पंकज रामटेके, घुग्घुस
चंद्रपूर:- केंद्र शासनाने नव्याने निर्माण केलेल्या कायद्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समित्या नष्ट होणार, शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळणार नाही आणि बाजारभाव ही मिळणार नाही, कामगार,मजूर, अडते,मुनीम,हमाल यांच्यासह लाखो लोक बेरोजगार होतील बाजार व्यवस्था मोडीत निघाल्यामुळे राज्याच्या महसुलात घट होणार राज्याचे उत्पन्न कमी होऊन त्याचा परिणाम ग्रामीण व शेती विकासावर होणार शेतकऱ्यांना करार शेतीच्या नावाखाली फसवून त्याला त्यांच्याच शेतात मजूर बनवले जाणार। यासह अनेक अडचणींना शेतकऱ्यांना दडपशाहीला बळी पडावे लागेल म्हणून केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी निर्माण करण्यात आलेल्या काळ्या कायद्याचा विरोध करण्यासाठी तसेच कामगार विरोधी बिलाचे निषेध व्यक्त करण्याकरिता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस मा.पालकमंत्री विजयभाऊ वड्डेटीवार, खासदार बाळुभाऊ धानोरकर तसेच जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हाअध्यक्ष प्रकाशभाऊ देवतळे यांच्या सुचनेनुसार घुग्घुस काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष राजुभाऊ रेड्डी यांच्या वतिने दुपारी ४ वाजता घुग्घुस येथील गांधी चौकात शासकीय नियमांचे पालन करून शेतकरी बचाओ डिजिटल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
या राज्यस्तरीय वेबीनार सम्मेलनात प्रदेश काँग्रेसचे संन्माननीय नेत्यांनी उपस्थित नागरिकांना नवीन शेती विषयक कायदा का नको
आहे. तसेच कामगार विरोधी बिलामुळे कामगारांवर होणाऱ्या अत्याचार व दडपशाही यावर मुद्देसूदपणे व अभ्यासपुर्ण रित्या आपले विचार मांडले.
  
या सम्मेलनात किसान काँग्रेस सेलचे जिल्हाअध्यक्ष रोशनभाऊ पचारे, अनुसुचित जाती विभागाचे जिल्हाअध्यक्ष पवन आगदारी कामगार नेते सय्यद अनवर, ज्येष्ठ नेते शामरावजी बोबडे, मुन्नाभाई लोहानी, बाबा कुरेशी, युवक नेते सुरज कन्नुर, युवक काँग्रेसचे अध्यक्ष तौफिक शेख, शेखर तंगलपेल्ली, कल्याण सोदारी, बापुजी क्षीरसागर,युवा नेते सिनु गुडला, शहजाद शेख, सचिन कोंडावार, प्रेमानंद जोगी, योगेश ठाकरे, संजय कोवे, नुरूल सिद्दीकी, सचिन गोगला, राजू पोलु, सुरज बहुराशी, निखील पुनगंटी, शाहरुख शेख, देवानंद ठाकरे, सुनील पाटील, घुग्घुस काँग्रेस कमेटी महिला आघाडीच्या सौ. पद्मा त्रिवेणी व मोठ्या संख्येने शेतकरी बांधव, काँग्रेस कार्यकर्ते व काँग्रेस महिला आघाडीच्य नेत्या उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने