युवकाने केली गळफास लावून आत्महत्या.

Bhairav Diwase
अद्याप आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.
Bhairav Diwase. Nov 05, 2020
ब्रम्हपुरी:- चंद्रपूर जिल्ह्यात आत्महत्या केल्याची घटनेत वाढ झाली असून ब्रम्हपुरी तालुक्यातील युवकाने केली गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना पहाटेच्या सुमारास घडली. मृतक युवकांच नाव अंकित राधेश्याम शिंगाडे (20) हा रा. चिंचोली ता. ब्रम्हपुरी येथील रहिवासी असून स्वतः गळफास लावून आत्महत्या केली. मृतक युवकाच्या परिवारात आई- वडील, भाऊ असा परिवार आहे. परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावात शोककळा पसरली आहे. अद्याप आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. पुढील तपास ब्रम्हपुरी पुलिस करीत आहेत.